अंतिम मतदार यादीमध्ये २४ लाख ५३ हजार १०२ मतदार
मुंबई: मुंबईमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या वाढत असून १०४ जणांनी थर्डजेंडर (तृतीयपंथी) म्हणून मतदार यादीमध्ये नांव नोंदणी केले आहे. मुंबई शहर आणि जिल्ह्यात एकूण २४ लाख ५३ हजार १०२ मतदार आहेत. यापैकी १०४ जणांनी जे थर्डजेंडर असल्याची नोंद केलेली आहे. थर्ड जेंडर अशी नोंदणी करण्याची सुविधा दिल्यानंतर मुंबई शहर आणि जिल्हयातील १०४ जणांनी तशा प्रकारे नाव नोंदणी केली असल्याची माहिती मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली. १ जानेवारी २०१८ रोजी मतदार यादी अंतिम करण्यात आलेली आहे. १ जानेवारीच्या अंतिम मतदार यादीमध्ये २४ लाख ५३ हजार १०२ मतदार आहेत. यापैकी १३ लाख ४६ हजार ९०४ पुरूष आणि ११ लाख ६ हजार ९४ महिला मतदार आहेत.
“सुलभ निवडणूका” या वर्षीची थीम
नागरिकांमध्ये मतदार जागृती कार्य़क्रमासाठी या वर्षी “सुलभ निवडणूका” ही थीम घेऊन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी राजऱ्या केल्या जाणाऱ्या ८ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता यांनी दिली आहे. निवडणूकामध्ये दिव्यागांचा सहभाग वाढावा यासाठीही विशेष असे प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त मुंबईत शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, नविन मतदारांना ओळखपत्र वाटप,लोकशाही प्रति निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा असे कार्यक्रम मुंबईतील जयहिंद महाविद्यालयात घेण्यात येणार आहेत.