मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात प्रथमस्थानी

0

मुंबई । मुंबईतलं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातलं प्रथम क्रमांकाचं विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनल  ने विमानतळ सेवेच्या गुणवत्तेवरून दिलेल्या क्रमवारीनुसार हा मान मुंबई विमानतळाला मिळाला आहे. मुंबईसोबतच दिल्ली विमानतळानेही हा मान पटकावला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दरवर्षी 40 दशलक्ष प्रवाशांचा राबता असतो. या निकषावर मुंबई आणि दिल्ली विमानतळाला हा मान मिळाला आहे. त्या खालोखाल 5 ते 15 दशलक्ष प्रवाशांना सेवा देणार्‍या हैदराबाद विमानतळाचा क्रमांक आहे. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळ जीएमआर समूह तर मुंबई विमानतळ जीव्हीके समूह चालवतात. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलने एक सर्वेक्षण केले होते. त्याआधारे या ही क्रमवारी ठरवली गेली. एअरपोर्टचा अ‍ॅक्सेस, चेक-इन, सुरक्षा स्क्रीनींग, विश्रामगृह, सामानाची व्यवस्था, रेस्टॉरंट आदी 34 निकषांवर जागतिक पातळीवर हे सर्वेक्षण करण्यात आले.