मुंबई आता मुंबापुरी नाही तर तुंबापुरी झाली आहे; धनंजय मुंडेंचा टोला

0

मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. सर्वत्र पाणी तुंबले आहे. यावरून मुंबई महानगर पालिकेला लक्ष केले जाते आहे. दरम्यान आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष केले. सत्ताधाऱ्यांमुळे मुंबापुरी आता तुंबापुरी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. या परिस्थितीला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचे आरोप मुंडे यांनी केला आहे. मुंबईत पाण्याच्या निचरा व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र झालेला खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याचे मुंडे यांनी सांगितले.