मुंबई नियोजित मराठा क्रांती मोर्चानिमित्त जामनेर येथे बैठक

0

जामनेर। मुंबईला होणार्‍या 9 ऑगस्टच्या मराठा क्रांति मोर्च्याच्या नियोजना करीता जामनेर कृउबा समितीत मराठा क्रांती मोर्चा समीतीच्या वतीने नुकतीच बैठक घेण्यात आली. बैठकीला जळगाव येथील आयोजक श्री बच्छाव सर,विलास पाटील,सुनील गरुड तसेच जामनेर तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीची सुरुवात जिजाऊ मॉ साहेब यांच्या फोटोला वंदन व हार घालून करण्यात आली. बैठकीला बच्छाव सर यांनी मार्गदर्शन केले.

शिस्तबद्ध पध्दतीने सहभागी होण्याचे आवाहन
त्यात त्यांनी मोर्चाला जातांना आप-आपल्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करून व तसेच बसने वा रेल्वेने प्रवास करतांना तिकीट काढूनच प्रवास करायचा असल्याचे सांगितले. समाजाचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेऊन प्रवास करताना रेल्वेतील वा एसटी बस मधील इतर प्रवाशांशी व अधिकारी वर्गाशी हुज्जत वा वाद न करीता प्रवास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच मुंबईतही मोर्च्यामधे सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने सामील व्हायचे असून कुठलाही गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घ्यावयाची आहे, तसेच मोर्च्यांची पूर्व तयारी म्हणून 6 ऑगस्टला रविवारी जामनेर शहरात मोटरसायकल रॅली काढून जनजागृती करावयाची आहे.असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आयोजक समीतीच्या वतीने बैठकीत करण्यात आले.