मुंबई : सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र बंदला मुंबई ठाणे नवी मुंबई भागात आज सूट देण्यात आली असली तरी घाटकोपर आणि चेंबुरमध्ये बंदला प्रतिसाद मिळला आहे. मराठा आंदोलकांनी संवाद यात्रेचे आयोजन केले. यावेळेस बाहेरुन आलेले लोक हिंसा करुन मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप सहभागी आंदोलकांनी केला आहे. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत घाटकोपर आणि चेंबुरमध्ये विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग नोदवला. तसेच बारामतीच्या मराठा आंदोलकांनी आझाद मैदानापर्यंत संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस बाहेरुन आलेले लोक हिंसा करुन मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप सहभागी आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. शहरातल्या संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पूर्व उपनगरात काही ठिकाणी कार्यकर्त्यानी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करण्याचे तुरळक प्रकार वगळता आंदोलन शांततेत पार पडले. शाळांना सुटी देण्यात आली होती तर महाविद्यालयात प्रशासनालाही अंतर्गत निर्णय घेण्याचा अधिकार शासनाने दिला होता. त्यामुळे सकाळी रोज दिसते तशी गर्दी लोकल किंवा बस सेवे त दिसली नाही. मुंबई शहरातल्या वाहतुकीवर या आंदोलनाचा कोणताही परिणाम झाला नाही. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून परळ, मुंबई सेंट्रल आणि कुर्ला आगारातून बाहेरगावी जाणा-या बसेस सकाळी ११ वाजेपर्यंत सेवा सुरू करण्यात आली नव्हती. मात्र, स्थानिक प्रशासनाशी आणि पोलिसांशी चर्चा करून जवळच्या मार्गांवर वाहतूक सुरू करण्यात आली. त्याचबरोबर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवाही सुरळीत आहे. प्रत्येक स्थानकावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहर आणि उपनगरात बेस्टची वाहतूकही सुरळीत सुरू होती.
हे देखील वाचा
इतिहासात प्रथमच ससून डॉकमधील मच्छी बाझार संपूर्णपणे बंद
९ अॉगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकाराला असताना काल पर्यंत मुंबई बंद असणार की नाही अशी चर्चा असताना मुंबई बंद शांततेत पार पडला. गोराई बोरीवली, माटूंगा किंग सर्कल,दादर प्लाझा,दादर टिटी, कुर्ला, घाटकोपर पश्चिम, चेंबूर – सायन,गोरेगांव अंधेरी पश्चिम विक्रोळी पार्क साईट बंद होते. विशेष म्हणजे इतिहासात प्रथमच ससून डॉक मधील मच्छी बाझार संपूर्णपणे बंद होता. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई मधे बंद पाळण्यात आला. हा बंद संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने पार पडला. कोणतेही हिंसक वळण इथे लागले नाही. बंद होत असताना मुंबई समन्वयक असणाऱ्या अमोल जाधवराव, केदार सुर्यवंशी, धनंजय शिंदे, सोपान मोरे, विशाल पाटील यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले होते.