मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात; युवकाचा मृत्यू

0

कामशेत : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली गावच्या हद्दीत शुक्रवारी दि.१४ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कारने टँकरला पाठीमागून जोरात धडक दिली. या झालेल्या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कुणाल मयुरेश्वर राजे वय २३, रा. महेशनगर,पिंपरी हा एमएच-१४. ईयु ४००२ या क्रमांकाच्या कार मधून शुक्रवारी मुंबई येथून पुण्याकडे येत असताना पिंपळोली गावच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावरून चाललेल्या गॅस टँकर एपी-३१.टीई. ६९५९ ला पाठीमागून कारने जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातातील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी.बी.पाटील हे करत आहेत.