मुंबई : महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता शाहरुख, रणबीर कपूर, अक्षयकुमार, यांच्या सह बॉलिवूड मधील तारे तारकांच्या मांदियाळीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत काल रात्री झालेल्या मुंबई पोलिसांच्या ‘उमंग 2018’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने बीकेसी च्या मैदानावर पोलीस कुटुंबियांचा आनंद द्विगुणित केला. मुंबई पोलीस दलाच्या वतीने आयोजित उमंग 2018 कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर, चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा, दिग्दर्शक रमेश सिप्पी, जितेंद्र, श्रीदेवी, बोनी कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, अनुष्का शर्मा, जॉनी लिव्हर, अभिनेत्री कंगना राणावत, हेमामालिनी, दीपिका पदुकोण, रोहित शेट्टी, श्रेयस तळपदे यांच्यासह बॉलिवूड मधील तारे, तारका यांनी उपस्थिती लावली होती.
दिग्दर्शक करण जोहर यांनी अभिनेता अमीर खान याची मुलाखत घेतली. अमृता फडणवीस यांनी ‘फिरसे…’ हे गाणं सादर केले. अभिनेता जितेंद्र यांचे आयुक्त पडसलगीकर यांनी स्वागत केले. अभिनेत्री आलिया भट, रणवीर सिंग, हास्य अभिनेता सुनील ग्रोव्हर, गायक हिमेश रेशमिया, अनचना सुखानी, मलायका अरोरा, नेहा कक्कर, गायक मिका सिंग यांच्यासह विविध गायकांनी व नृत्य कलावंतांनी हिंदी गीतांवर कला सादर केली. मुंबई पोलिसांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन याच्या हस्ते झाले.