मुंबई मनपाचा विकासकामांवर 82.68 टक्के खर्च

0

मुंबई । मुंबईत विकासकामांची बोंब असताना, भांडवली खर्चाच्या विनियोगात 31 टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मागील दहा वर्षातील हा उच्चांक असून आर्थिक वर्ष 2017-18 च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार भांडवली खर्चासाठीच्या 6 हजार 111 कोटींच्या तरतुदींपैकी 5 हजार 52 कोटी म्हणजेच 82.68 टक्के एवढी रक्कम विविध विकासकामांवर खर्च झाली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुंबईकरांना सोयीसुविधा पुरवण्याचे काम पालिका करते. अर्थसंकल्पात त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. रस्ते, पर्जन्यजल वाहिन्या, पाणीपुरवठा व मलनि:सारण, विकास नियोजन, सार्वजनिक आरोग्य, प्रमुख रुग्णालये, उद्याने, मंडई यासारख्या लोकापयोगी कामांचा समावेश असतो. आर्थिक वर्ष 2017-18 च्या सुधारित अंदाजपत्रकातील रुपये 999.70 कोटींच्या तरतुदी केली होती. यापैकी 982.43 कोटी रक्कम म्हणजेच तब्बल 98.27 टक्के खर्च झाली आहे.