मुंबई मॅरेथॉनमध्ये जळगाव रनर्स ग्रुपचे यश!

0

11 धावपटूंनी पूर्ण केली 42 किलोमीटर अंतराची मॅरेथॉन

जळगाव । जळगाव रनर्स ग्रुपच्या धावपटूंनी मुंबई येथे आयोजित ‘मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेत सहभाग नोंदवून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. 42 किलोमीटर फूल मॅरेथॉन, 21 किलोमीटर हाफ मॅरेथॉन व ड्रीम रन (6.6 किलोमीटर) अशा तीनही प्रकारात जळगाव रनर्स ग्रुपच्या धावपटूंनी सहभाग घेत मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली. मुंबईसारख्या महानगरात आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून यश मिळवणारा जळगाव रनर्स ग्रुप पहिलाच ठरला आहे. मुंबईत येथे रविवारी ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत पहिल्यांदाच जळगाव रनर्स ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील धावपटूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

22 धावपटूंनी 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन
11 धावपटूंनी 42 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली. त्यात किरण बच्छाव, नीलेश भांडारकर, विक्रांत सराफ, गुरुप्रसाद तोतला, डॉ. तुषार चोथाणी, डॉ. विवेक पाटील, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. रवी हिराणी, मोईज लहेरी, ऍड. सागर चित्रे, गीतेश मुंदडा यांचा समावेश होता. तसेच 22 धावपटूंनी 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. यात प्रेमलता सिंग व डॉ. सोनाली महाजन यांचा समावेश होता. मुंबई मॅरेथॉनच्या ड्रीम रन प्रकारात 12 धावपटूंनी सहभाग नोंदवला होता.