मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु व शिक्षण मंत्रयांच्या विरोधात वाशीत निदर्शने

0

ऐरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवी मुंबईच्या वतीने मुंबई विद्यापीठ, विद्यापीठाचे कुलगुरु व शिक्षण मंत्र्त्रयांच्या विरोधात मंगळवारी तीव्र निदर्शने वाशी मध्ये करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय (मॉडर्न महाविद्यालय) च्या समोर सकाळी 10 वाजता विध्यर्थ्यानी जोरदार निदर्शने करण्यात आले. या निदर्शनात अभाविपच्या वतीने कुलगुरु आणि शिक्षण मंत्रयांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अकार्यक्षम कुलगुरु आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वा निदर्शनात करण्यात आली.

2.5 लाख उत्तरपत्रिका तपासणी बाकी
विद्यापीठाचे कायद्यानुसार 45 दिवसात निकाल जाहिर झाला पहिजे तरी सुद्धा 90 दिवासनंतर ही निकाल लागले नाहीत. जवळपास 2.5 लाख उत्तरपत्रिका तपासणीचा काम राहिल आहे. ऑनलाइन तपासणी च्या नावाखाली कुलगुरुनी विद्यार्थ्यांच्या एक वर्ष वाया घालवायचा आरोप ही लावला. ज्या विद्यार्थ्यांना दुसर्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश ची मुदत संपल्यामुळे प्रवेश घेता येणार नाही. या निदर्शनात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी एका स्वरात शिक्षण मंत्री व कुलगुरुंचा राजीनामा मागितला व लवकरात निकाल जाहिर करावे तसेच पुनर्तपासणी व पुनर्मूल्यांकन चे शुल्क ही कमी करावेत अशी मागणी केली गेली.