मुंबई विद्यापीठातील २८ हजार विद्यार्थांचे निकाल बाकी

0

मुंबई । मुंबई विद्यापीठ नेहमी कोणकोणत्या वादाने घेरलेले असतो. यावेळी तर निकालासंदर्भात घोळ झाला आहे. हे तर आता प्रभारी कुलगुरुंनीच मान्य केले आहे. विद्यापीठाच्या हलगर्जीमुळे २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असून त्यांना शून्य मार्क देण्याचा प्रताप मुंबई विद्यापीठानं केला आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुळे आणि इतर अधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन ही चूक मान्य केली.

आतापर्यंत मुंबई विद्यापीठानं ४७७ पैकी ४६९ विभागाचे निकाल लावले आहेत. तर १७ लाख उत्तरपत्रिकांपैकी ३५ हजार उत्तरपत्रिका तपासण्याचं काम अजूनही बाकी आहे.सक्तीच्या रजेवर गेलेले कुलगुरु संजय देशमुख यांनी ऑनलाईन उत्तरपत्रिका तपासण्याचा घेतलेला निर्णय विद्यापीठाच्या चांगलाच अंगलट आला आहे. याआधी सहावेळा मुंबई विद्यापीठाने डेडलाईन पुढे सरकवली आहे.