शिरपूर । तालुक्यातील तांडे येथील मुकेश आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूल मध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
स्कूल डायरेक्टर हेमंतकुमार शर्मा, एम.आर.पटेल मिलिटरी स्कूलचे प्राचार्य दिनेशकुमार राणा, अमरिशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलचे प्राचार्य निश्चल नायर आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अनेक नवनवीन उपक्रम सादर करुन विविध वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास मदत झाली. यावेळी विविध विषयांचे देखील अनेक प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कालावधीत परिसरातील व शिरपूर शहरातील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून विज्ञान प्रदर्शनास भेट दिली. या प्रदर्शनातील सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सहअध्यक्ष भुपेशभाई पटेल, ट्रस्टी तथा नगरसेवक तपनभाई पटेल, राजगोपाल भंडारी, ट्रस्टी चिंतनभाई पटेल, आर.सी.पटेल संकुल सीईओ डॉ. उमेश शर्मा आदींनी कौतुक केले.