शिरपूर। मुकेश आर. पटेल इंग्लिश मेडीयम स्कूल येथे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा संगिता देवरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली. मुकेश आर. पटेल इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सिनिअर के.जी. च्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे सोहळयात एस.एम.पटेल ऑडीटोरीअम हॉलमध्ये दि. 8 एप्रिल रोजी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
स्वागत गीत गायन
कार्यक्रमात दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायन केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सिनिअर के.जी. तुकडी बी च्या विद्यार्थ्यांनी थ्ँक यू साँग (ढहरपज्ञ र्धेी डेपस) नृत्यावर सादर केले तसेच सिनिअर के.जी. तुकडी ए च्या विद्यार्थ्यांनी रेडी टू गो साँग नृत्यावर सादर केले. नंतर सिनिअर के.जी. तुकडी ए व सिनिअर के.जी. तुकडी बी च्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या कलाविष्काराने उपस्थितांना दाद द्यायला भाग पाडले.
शिक्षकांचे मार्गदर्शन
सिनिअर के.जी. तुकडी ए व तुकडी बी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करतांना मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई यांचे तसेच त्यांचे वर्गशिक्षक मनिषा देशमुख यांचे आभार मानले. सिनिअर के.जी. तुकडी बी च्या वर्गातील हिमांशू पाटील याची आई ललिता पाटील यांनी शाळेबद्दल व शाळेतील राबविल्या जाणार्या उत्कृष्ट कार्यक्रमांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन योगिता निकम यांनी केले. यशस्वीतेसाठी शिक्षिका मनिषा देशमुख, वर्षा पाटील, मनिषा वानखेडे यांचे सहकार्य लाभले.