मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह स्वीय सहाय्यकाला ‘कोरोना’

अ‍ॅन्टीजन चाचणी चाचणीत कोरोनाचे निदान : संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी या दोघांची कोरोना अ‍ॅन्टीजन चाचणी पॉझीटीव्ह आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे. गेल्या तीन-चार दिवसात आमचे संपर्कात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.