मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा पाटील

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी। येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनीषा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

निवडणुकीनंतरची पहिला सभा शनिवारी पार पडली. यात प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांंजली वाहण्यात आली. त्यानंतर,उपनगराध्यक्ष निवड, स्विकृत नगरसेवकांची निवड प्रकीया पारपडली. उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका मनिषा प्रवीण पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. तर स्विकृत नगरसेवक पदासाठी डॉ. प्रदिप शालिग्राम पाटील, ललित शांताराम महाजन यांच्या नावाचे पक्षाचे अधिकृत पत्र गटनेता पियुष मोरे यांनी पीठासीन अधिकार्‍यांना दिले. त्या नुसार डॉ. पाटील व ललित महाजन यांची स्विकृत नगरसेवक पदाचा ठराव मंजूर होऊन प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला आहे. तर नगराध्यक्ष नजमा ईरफान तडवी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मुख्याधिकारी शाम गोसावी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील यांनी सहकार्य केले.