प्रचाराचा नारळ फुटला : कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
मुक्ताईनगर- नगराध्यक्ष पदासह सात नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस रींगणात उतरली असून मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.जुने गावातील हनुमान मंदिराजवळ नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.जी.एन.पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा परीषदेचे प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आला तसेच दर्ग्यावर चादर चढवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदयसिंह पाटील, जळगाव जिल्ह्याचे सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, संजय पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जिल्हा सचिव आसीफ खान, ईस्माईल खान, पांडुरंग राठोड, अरुण कांडेलकर, आलम शहा, अॅड.आसीफआझाद, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधुरी आत्माराम जाधव तसेच सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.