मुक्ताईनगरातील ‘त्या’ डॉक्टराविरूद्ध अखेर गुन्हा

0

मुक्ताईनगर : वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना आयुर्वेदिक दवाखाना चालवणार्‍या चंदन चंडीदास बक्षी (बंगाली) यास मुक्ताईनगर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बक्षी यांच्याविरूद्ध कारवाई करण्याविषयीचे पत्र बोगस वैद्यकीय व्यावसायिक समितीचे अध्यक्ष, सचिव यांनी 29 एप्रिल रोजी पोलिस निरीक्षकांना दिल्यानंतर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर गुन्हा झाला दाखल
चंदन चंडीदास बक्षी (बंगाली) याच्याकडे कोणतेही वैद्यकीय शैक्षणिक प्रमाणपत्र नसतांना तो मूळव्याध व भगंदर आजारांवर उपचार करीत माहिती शहरातील प्रवीण भोई यांनी 24 एप्रिल रोजी तालुका आरोग्याधिकारी डॉ.नीलेश पाटील यांना दिली होती तर बोगस वैद्यकीय व्यावसायिक समितीचे अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी सुभाष मावळे व समितीचे सचिव तथा तालुका आरोग्याधिकारी डॉ.पाटील यांनी बक्षी यास 24 रोजी नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे बजावल्यानंतर संबंधिताने कुठलीही कागदपत्रे सादर न केल्याने संशयीताकडे वैद्यकीय व्यवसाय चालविण्याचे प्रमाणपत्र नाही म्हणून बीडीओ तथा समितीचे अध्यक्ष मावळे यांचे फिर्यादीवरुन रुग्णांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक कैलास भारसके करीत आहेत.