मुक्ताईनगर : कोरोना संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव देशभरात व राज्यभरात दिवसेंदिवस वाढतच असून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक असून याकाळात मुस्लिम समाजातील अतिशय पवित्र रमजान महिना सुरू असल्याने या काळात बाजार पेठ अशीच सुरू राहिल्यास सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडेल व रमजान ईद च्या खरेदीसाठी लोक बाहेर पडतील त्यामुळे कोरोना संसर्ग फैलावण्याचा धोका जास्त प्रमाणात होऊ शकणार असल्याने मुक्ताईनगरची पूर्ण बाजारपेठ रमजान ईद होईपर्यंत बंद ठेवण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मुस्लिम समाज (पंच) व मुस्लिम नगरसेवकांनी आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार शाम वाडकर यांना दिले.
ठाकरे सरकारचे केले अभिनंदन
संकट काळात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याची धुरा सक्षमपणे पेलत असून कोरोना संकटाशी राज्यसरकार व प्रशासन कौतुकास्पद कार्य करीत असून या कार्याबद्दल ठाकरे सरकारचे अभिनंदन देखील निवेदनात करण्यात आले आहे.
तर गर्दी बाहेर पडून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून रमजान ईद होई पर्यंत बाजार पेठ बंद ठेवण्यात यावी. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मुक्ताईनगर याला अपवाद आहे परंतु सध्या कोरोना आजाराची आता चौथी स्टेज सुरू झाली असून जळगांव जिल्ह्यात व राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. बाजार पेठ सुरू राहिल्यास ईदच्या खरेदी-विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडतील तसेच बाहेरील गावाचे व्यापारी लोक खरेदी विक्री साठी व्यापार करण्यासाठी शहारात दाखल होतील . यात एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह आल्यास संपूर्ण मुक्ताईनगर शहरात व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
स्थानिक प्रशासनाचे उत्तम नियोजन
आतापर्यंत मुक्ताईनगर प्रशासनाने (तहसील विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व नगरपंचायत विभाग) यांनी अतिशय उत्तम रीतीने नियोजबद्ध कोरोना आजारापासून लोक कसे वाचतील म्हणून मेहनत घेतली त्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही अभिनंदन ज्यांनी कोरोना काळात परिस्थिती अतिशय कुटुंब प्रमुखाप्रमाणे हाताळत आहेत त्यामुळे महामारीच्या लढ्यात कर्तव्य मुस्लिम समाज पंच व मुस्लिम नगरसेवक मुक्ताईनगर यांनी असा निश्चय केला आहे की , रमजान ईद अतिशय साद्या पद्धतीने करावा व देश आज महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे म्हणून रमजान ईद सणासाठी लागणारा पैसा गरीब व गरजू , बेरोजगार लोकांमध्ये मदत करावी अशी भूमिका घेण्यात आली तसेच अत्यावश्यक सेवा वगळता बाजार पेठ बंद ठेवावे व कोरोना संकट जात नाही तोपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर नगरसेवक शे.शकील शे.शकुर, जाफर अली, आरीफ आझाद, आसीफखान इस्माईल खान, शे.शकुर शे.शफी, शे.शकील शे मुराद, सलीम खान, शे.भिकन शे.चांद, शे.लुकमान शे.बशीर, सै.जहिरोद्दीन, एजाज खान, अहमद खान, युसूफ खान महेबूब खा, नुरमोहम्मद खान, आसीफ बागवान, शे.मुशीर, अमीन खान यांच्यासह असंख्य मुस्लिम समाज पंच व मुस्लिम समाज बांधव यांच्या स्वाक्षर्या आहेत.