मुक्ताईनगरातील लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी जाळ्यात

8
अनुकुल शिक्षकाचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी स्विकारली तीन हजारांची लाच
भुसावळ :- मुक्ताईनगरचे शिक्षण विस्तार अधिकारी जगतसिंग दगडू पाटील यांना तीन हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. शिक्षक असलेल्या तक्रारदाराचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी तसेच शाळेच्या वार्षिक तपासणीचा अनुकुल अभिप्रायासाठी आरोपी जे.डी.पाटील यांनी तीन हजार पाचशे रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर शनिवारी सापळा रचण्यात आला. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी करण्यात आला.