मुक्ताईनगर- नायगाव येथील माहेर व मुक्ताईनगरातील सासर असलेल्या विवाहितेने माहेरून पैसे न आणल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विवाहिता भाग्यश्री चेतन पाटील (28) यांच्या फिर्यादीवरून पती चेतन निवृत्ती पाटील, सासू रुख्मिबाई निवृत्ती पाटील, सासरे निवृत्ती दलपत पाटील, जेठ संजय निवृत्ती पाटील, नणंद सुनीता कैलास महाजन तसेच नंदोई कैलास लक्ष्मण महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी 11 मे 2013 च्या दीड महिन्यानंतर ऑगस्ट 2018 पूर्वी वेळोवेळी फिर्यादीच्या सासरी तसेच नायगाव येथे माहेरी वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. तपास सहायक फौजदार माधवराव पाटील करीत आहेत.