मुक्ताईनगर- नगरपंचायतीत विरोधी बाकावर असलेल्या शिवसेनेने जिल्हाधिकार्यांकडे नुकतीच गट नोंदणी केली. गटनेतेपदी तरुण नगरसेवक राजेंद्र सुकदेव हिवराळे तर उप गट नेते पदी संतोष सुपडू मराठे यांची निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी
17 सदस्य संख्या असलेल्या येथील नागरपंचयतीत भाजप गटाचे 14 तर शिवसेनेचे तीन नगर सेवक आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राजेंद्र सुकदेव हिवराळे, संतोष सुपडू मराठे व सविता सुभाष भलभले या तिन्ही नगर सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गट नोंदणी केली. गट नेतेपदी राजेंद्र हिवराळे तर उप गट नेते पदी संतोष मराठे यांची निवड करण्यात आली आहे. राजेंद्र हिवराळे नगरपंचायतीच्या तरुण नगर सेवकांपैकी एक असून प्रभाग क्रमांक 17 मधून ते निवडून आले आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांचे खंबीर सोबती म्हणून त्यांची ओळख आहे. गट नोंदणी प्रसंगी सुनील पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.