मुक्ताईनगरातील स्वस्त धान्यातील घोळाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

0

मुक्ताईनगर : शहरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कल्याण योजने अंतर्गत धान्य वाटप होत असलेतरी आधार लिंकच्या घोळाचा फायदा उचलून धान्य कपात करून रेशन दुकानदारांनी मुजोरी चालवली होती शिवाय केशरी रेशन कार्ड धारकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शहरातील जुने परवाने रद्द करून नव्याने शहरात प्रभाग वाईज 17 दुकानांची निर्मिती करण्यासंदर्भातील मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक संतोष मराठे यांनी ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठविले होते. या निवेदनावर अवघ्या दोन दिवसात प्रतिउत्तर मिळाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठविलेल्या प्रतिउत्तरात पुढील कारवाईसाठी ही तक्रार संबंधित विभागाला पाठविल्याचे म्हटले आहे. राज्याचे पुरवठा विभागाचे सचिव संजय खंडारे यांना देखील कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून तक्रारीची गांभीर्याने दखल
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय दक्ष असून ते सतत पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व राज्याच्या विविध विभागांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेततसेच राज्यातील जनतेत कोणताही संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य न करता दररोज फेसबुक लाईव्ह द्वारे नागरीकांशी संवाद साधत आहेत त्यासह ते राज्यभरातून येणार्‍या तक्रारींचा देखील निपटारा करीत आहेत. अतिशय कर्तव्य दक्ष व जागरूक मुख्यमंत्री असल्याची त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे. याची प्रचिती मुक्ताईनगरवासीयांनी देखील आली आहे. मुक्ताईनगरचे प्रभाग क्रमांक 12 चे शिवसेना नगरसेवक संतोष मराठे यांनी लॉक डाऊन काळात रेशन दुकानदारांद्वारा नागरीकांचे धान्य कपात व फिरवा फिरव तसेच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदर दुकानदार मुजोरी करीत असल्याचा आरोप करीत विद्यमान सहा दुकाने रद्द करून नव्याने प्रभाग वाईज 17 दुकानांची निर्मिती करावी व शहरातील 4 ते 5 हजार कुटुंबाचं सर्वे करून त्यांना प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थीचा दर्जा देण्यात यावा, असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच तहसीलदार व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले होते. यावर अवघ्या दोनच दिवसात नगरसेवक मराठे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिउत्तरादाखल मेल पाठविला आहे. त्यात मराठे यांच्या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्याच आदेश संबंधित विभागाला दिल्याचे म्हटले असून त्यासह राज्याचे पुरवठा विभागाचे सचिव संजय खंडारे यांना कारवाईच्या सूचना करण्यात आल्या आहेत.