मुक्ताईनगर- बाशिया महामार्ग क्रमांक 46 वरील घोडसगाव चौफुलीवर असलेल्या फौजी ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रक मधून रोकड असलेली बॅग व कपडे लांबवल्याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करण्यात आली. 1 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घोडसगाव चौफुलीवरील फौजी ढाब्यावर ट्रक उभा असताना संशयीत अआरोपी मोहम्मद शहजाद मोहम्मद जाकीर तसेच मोहम्मद फरहान मोहम्मद उस्मान यांनी बॅग लांबवली होती. बॅगेत 500 रुपयांच्या रोकडसह कपडे होते. आरोपींनी चोरीनंतर दुचाकी (एम.एच.28 -6753) वरून पळ काढला होता. या मुक्ताईनगर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पळत असताना त्यांचा पाठलाग करून अटक करण्यात आली. तपास हवालदार सुनील बडगुजर करीत आहेत.