मुक्ताईनगरात अवैध वाळू वाहतूक करणार डंपर जप्त : एकाविरोधात गुन्हा

मुक्ताईनगर : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा डंपर मुक्ताईनगर पोलिसांनी कोथळीजवळील उड्डानपुलाजवळ ताब्यात घेत एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. डंपर मालकाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून त्यास प्रतिबंध लावण्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कारवाई केली जता आहे. शुक्रवार, 18 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोथळी गावाजवळील हायवेजवळील उड्डाणपुलाजवळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अडीच ब्रास वाळुने भरलेले डंपर (क्रमांक एम.एच. 28 ए.बी.8145) जप्त करण्यात आले. कॉन्स्टैबल अनिल देवरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसात शिवाजी शांताराम सोनवणे (रा.साकेगाव, ता.भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डंपर मालकाची चौकशी हौणार असल्याची माहिती तपासी हवालदार अशोक जाधव यांनी सांगितले.