मुक्ताईनगरात आधार लिंकचा घोळ ; शिवसेना महिला आघाडीने तहसील प्रशासनाला दिला बांगड्यांचा आहेर

0

दिवाळीत शंभर टक्के धान्य वितरणाची मागणी ; तर सेना स्टाईल आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर- स्थानिक रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त करावा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के धान्य वितरीत करून आधार लिंकचा घोळ निस्तारला जात नाही तोपर्यंत रेशन कार्ड धारकांना धान्य वितरीत करावे या मागण्यांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 30 ऑक्टोबर रोजी शिवसेना महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात निष्क्रिय शासनाला बांगड्यांची भेट देत निदर्शने आंदोलन करण्यात आले. शिवसेना रणरागिणींच्या घोषणांनी तहसीलचा परीसर दणाणला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उप शहर संघटक विद्या भालशंकर, उप तालुका संघटक उज्वला सोनवणे, उप तालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, उपशहर संघटक यशोदा माळी, भारती हिवराळे यांच्यासह वैशाली चोपडे, अलका गुरचळ, नंदिनी बोदडे, ज्योती गुरचळ, इंदुबाई तायडे, कुसुम बोदडे, जनाबाई बोदडे, संगीता रोटे, भारती तायडे, इंदुबाई बोदडे, रेखा फुलपगारे, अंजु बोदडे आदींसह तालुकाप्रमुख छोटू भोई, गोपाळ सोनवणे, शहरप्रमुख गणेश टोंगे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहर संघटक वसंत भलभले, संतोष माळी, शुभम तळेले, भूषण वानखेडे उपस्थित होते.

ढिम्म प्रशासनाला बांगड्यांचा अहेर भेट
आधार लिंक घोळाबाबत तहसील आवारात बांगड्या फेको आंदोलनाच्या इशार्‍यानंतरही प्रशासनावर कोणताही सकारात्मक परीणाम न झाल्यामुळे सौभाग्याचे लेणं फेकुन अपमान न करता ढिम्म पुरवठा विभाग व शासनाचा निषेध म्हणून बांगड्यांचा आहेर भेट देत महिला आघाडीतर्फे निदर्शने आंदोलन करण्यात आले.

आधार लिंक व पुरवठा विभागाचा निष्काळजीपणा
गेल्या पाच ते सहा दिवसांपुर्वी पुरवठा विभाग व धान्य दुकानदारांच्या गलथान कारभाराने रेशन कार्ड लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक होतांना प्रचंड गोंधळ झालेला असून इतर जिल्ह्यातील नागरीकांचे आधार लिंक झालेले असून रेशन कार्ड धारकांना ई-पॉज मशीनवरून धान्य विकत घेतांना म्ंब मॅच न झाल्यामुळे सरळसरळ धान्य नाकारले जाते. त्यातच दिवाळी सण तोंडावर आला असताना गोरगरीब जनता केवळ आपल्या गलथान कारभारामुळे स्वस्त धान्यापासून वंचित ठरत आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजनेस रेशन दुकानदार व कार्डधारकांचा विरोध आहे. याचा फेरविचार व्हावा, माहे नोव्हेंबरमधील दिवाळी सण लक्षात घेता शंभर टक्के धान्य मिळणे अनिवार्य असतांना तालुका पुरवठा अधिकार्‍यांनी त्यात आणखी भर म्हणून सुलतानी आदेश काढीत रेशन दुकानदारांच्या 20 टक्के मालाची कपात केल्याचे देखील कळाल्याने पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त केला. आधार लिंकचा घोळा दूर करून ई – पॉज मशीन चालविण्यासाठी उद्भवणार्‍या इंटरनेट च्या समस्यांना शासनाने पर्यायी व्यवस्था करावी व हा घोळ पूर्णपणे सुधारीत होत नाही तोपर्यंत रेशन कार्ड धारकांना सरळसरळ धान्याचे वाटप करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीतर्फे करण्यात आली.