मुक्ताईनगरात एकाने कवटाळले मृत्यूला

0

मुक्ताईनगर- शहरातील रहिवासी पंढरी नथू सुरवाडे (38) या ईसमाने काहीतरी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संतोष नथू सुरवाडे यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहेत.