मुक्ताईनगरात खासदार रक्षा खडसे यांचा उद्या नागरी सत्कार

0

माजी महसूलमंत्री नाथाभाऊंची ‘आंबेतुला’ होणार

मुक्ताईनगर- रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांचा रविवारी वाढदिवस असल्याने त्यांचा नागरी सन्मान करण्यात येणार आहे. तत्पूर्वी खासदार खडसे यांच्या हस्ते रविवारी सकाळी साडेसात वाजता हरताळे येथील साईबाबा मंदिरात आरती केल्यानंतर त्या जुने कोथळी येथे मुक्ताई मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. याप्रसंगी कोथळी राम मंदिर येथे ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार असून सकाळी साडेनऊ वाजता साई गजानन नगरातही त्यांचा भव्य सत्कार होईलत्शिवाय सकाळी 10 वाजता भाजपातर्फे आयेाजित कार्यक्रमास त्या उपस्थिती दिली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मुक्ताईनगरातील भाजपा पदाधिकार्‍यांनी केले आहे.

माजी महसूलमंत्र्यांची होणार आंबेतुला
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी जमीन प्रकरणात एसीबीने क्लीन चीट दिल्याने भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख (पूरनाड) यांच्यातर्फे रविवारी दुपारी 12 वाजता ’मुक्ताई’ या खडसे फार्म हाऊसवर त्यांची आंबे तुला करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन संदीप देशमुख यांनी केले आहे.