मुक्ताईनगरात गरजूंना ब्लँकेटसह मिठाईचे वाटप

0

मुक्ताईनगर- शहरातील प्रवर्तन चौकातील पानटपरी व्यावसायीक धनंजय सापधरे यांनी पत्नी सपना धनंजय सापधरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजूंना ब्लॅकेटसह मिठाईचे वाटप करण्यात आले तसेच जळगावच्या मातोश्री वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळींसोबत एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे, नगराध्यक्षा नजमा तडवी, डॉ.जगदीश पाटील, अ‍ॅड.राहुल पाटील, सावकारे, पोलिस पाटील मोहन मेढे, धनंजय सापधरे आदींची उपस्थिती होती.