मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ते ईच्छापूरकडे जाणार्या महामार्गावरील बजरंग ढाब्याच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध झन्ना-मन्ना नावाच्या पत्त्याच्या क्लबवर मुक्ताईनगर पोलिसांनी छापा टाकत दोघा जुगारींना अटक केली तर 10 जुगारी पळुन जाण्यात यशस्वी झाले. 37 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवार, 15 जानेवारी रोजी रात्री सात वाजता ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुक्यातील मुक्ताईनगर ते ईच्छापूरकडे जाणार्या हायवे रस्त्यावरील बजरंग ढाब्याच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध झन्ना-मन्ना नावाच्या पत्त्याचे क्लबवर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. पोलिस येताच 8 ते 10 जुगारी अंधाराचा फायदा घेवून पसार झाले तर विजय वामन लोणारी (रा.ईच्छापूर, जि.बर्हाणपूर) व अख्तरखान जब्बारखान (शहापूर) यांना अटक करण्यात आली. संशयीतांकडून दोन दुचाकींसह दोन हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिस नाईक गजमल पाटील यांच्या फिर्यादीवरुन दोघा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम काकडे, पोलिस नाईक गजमल पाटील, उमेश महाजन, सुनील नागरे, राहुल महाजन, राहुल बेहेनवाल, असीम तडवी, कांतीलाल केदारे, नितीन चौधरी, नायसे आदींच्या पथकाने केली.