मुक्ताईनगरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले

0

मुक्ताईनगर- शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याची घटना गत आठवड्यात घडली असतानाच सोमवारीदेखील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 20 गॅ्रमचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार महिला मंगलाबाई युवराज खेवलकर (50, संताजी नगर, मुक्ताईनगर) या मानसी ब्युटी पार्लरजवळून जात असताना स्कुटीवरून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील दोन तरुणांनी काही कळण्याच्या आत महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केला. तपास उपनिरीक्षक अशोक उजागरे करीत आहेत.