मुक्ताईनगरात पोलीस पाटील यांना ओळखपत्राचे वितरण

0

जिल्हा अपर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत झाली शांतता समितीची सभा

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर तालुका शांतता समितीची बैठक जळगाव जिल्ह्याचे नूतन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांना लोहीत मतानी यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष नेवे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत कडूकार, सचिन इंगळे, बोदवड पोलीस निरीक्षक सतीश भामरे, वरणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निलेश वाघ, सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी अध्यक्ष आमीर साहब, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, मुक्ताईनगर तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष ताहेर खान,नगरसेवक,पत्रकार ,पोलीस पाटील संघटनेचे माजी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मोहन मेढे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दीपक चौधरी, उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, कार्याध्यक्ष कैलास बेलदार, सचिव दिलीप पाटील, सहसचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष मनोज महाजन तसेच संघटनेचे जळगाव जिल्हा सदस्य स्नेहल काळे, विजय पाटील, महेश पाटील व तालुक्यातील कार्यकारणी सदस्य व सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

अपर पोलीस अधीक्षकांना प्रतिमा भेट
शांतता समितीच्या बैठकीप्रसंगी पोलीस पाटील संघटनेतर्फे अपर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी लोहित मतानी यांनी पोलीस पाटील यांनी जागृतपणे आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. सूत्रसंचलन भूषण चौधरी यांनी व्यक्त केले.