नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार नजमा तडवी आघाडीवर
मुक्ताईनगर- जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीत आतापर्यंत सहा प्रभागांमध्ये भाजपाचे कमळ फुलले असून एका जागेवर अपक्षाची वर्णी लागली तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी या दुसर्या फेरीअखेर 987 मतांनी आघाडीवर आहेत.
भाजपा उमेदवारांचा विजय
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग एकमध्ये बबलू उर्फ संतोष प्रल्हाद कोळी (246) हे भाजपा उमेदवार विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उमेदवार प्रशांत अशोक टोंगे (231) यांचा पराभव केला तर प्रभाग दोनमध्ये भाजपा उमेदवार शबाना बी.आरीफ आझाद (389) या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या शगुप्ता अख्तर खान (335) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवार नूसरतबी मेहबूद खान (333) विजयी झाल्या. त्यांनी भाजपा उमेदवार रचना गजानन वंजारी (283) व शिवसेना-राष्ट्रवादीचे उमेदवार विजया दीपक नाईक (192) यांचा पराभव केला. प्रभाग चारमधून भाजपाच्या बिल्कीस अमान उल्लाह खान (234) या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेना उमेदवार अफरोज शब्बीर शेख (187) यांचा पराभव केला. प्रभाग पाचमधून भाजपाच्या शमीम अहमद खान (243) विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या तसनीम कौसर आसीफ आझाद (40) व शिवसेनेच्या हमीदा बी.गयास शेख (118) यांचा पराभव केला. प्रभाग सहामधून भाजपाचे मुकेशचंद वानखेडे विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेच्या प्रशांत भालशंकर यांचा पराभव केला. प्रभाग सातमधून भाजपाचे पियुष भागवत मोरे हे विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेच्या ज्योती त्रिलोक मालचे यांचा पराभव केला. दरम्यान, दुसर्या फेरीअखेर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी या 987 मतांनी आघाडीवर आहेत.