17 पैकी 13 जागांवर कमळ उमलले : सेनेला अवघ्या तीन जागांवर यश, अपक्षालाही संधी
मुक्ताईनगर- जळगाव जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जादू चालली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नजमा तडवी या एक हजार 175 मतांनी विजयी झाल्या आहेत. भाजपाचे 13 उमेदवार विजयी झाले असून तीन ठिकाणी शिवसेना तर एका ठिकाणी अपक्षाची वर्णी लागली आहे. दरम्यान, सुरुवातीला प्रभाग क्रमांक 14 मधून अपक्ष उमेदवार शीतल लक्ष्मण सापधरे यांना विजयी घोषित करण्यात आले होते मात्र फेरमतमोजणीचा अर्ज दिल्यानंतर शिवसेना उमेदवार सविता भलभले (405) विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 11 व 13 साठी फेरमतमोजणी करण्यात आली मात्र चित्र ‘जैसे थे’ राहिले.
प्रभाग क्रमांक एक : भाजपाचे संतोष कोळी विजयी
प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाचे उमेदवार संतोष प्रल्हाद कोळी (246) मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना उमेदवार प्रशांत अशोक टोंगे (231) यांचा पराभव केला. प्रभागातील अपक्ष सुधाकर पंकज कोळी (73), मनीषा दीपक कांडेलकर (48), काँग्रेसचे रवींद्र देविदास धनगर (23), डिगंबर सुपडू पाटील (205), राहुल अशोक पाटील (44) यांचा पराभव झाला.
प्रभाग दोन : भाजपाच्या शबाना आरीफ विजयी
प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपाच्या शबाना अब्दुल आरीफ (389) विजयी झाल्या. त्यांनी सेनेच्या शगुप्ताबी अफसर (335) यांचा पराभव केला. काँग्रेसच्या सलीमा बी.आलमशाह (34), अपक्ष स्वाती सुनील माळी (57) यांचा पराभव झाला.
प्रभाग तीन : अपक्ष नुसरत खान विजयी
प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपा बंडखोर तथा अपक्ष उमेदवार नूसरत बी.मेहबूब खान (333) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या रत्ना गजानन वंजारी (283) तसेच राष्ट्रवादीच्या विजया दीपक नाईक (192) यांचा पराभव केला. काँग्रेसच्या पौर्णिमा पवन खुरपडे (153), अपक्ष योगीता बाळकृष्ण चव्हाण (8), वंदना गणेश तेली (14), सुलभा नीलेश भालेराव (5), पूनम प्रवीण वंजारी (88) यांचा पराभव झाला.
प्रभाग चार : भाजपाच्या बिलकिसबी विजयी
प्रभाग क्रमांक चारमधून भाजपाच्या उमेदवार बिलकिसबी अमानुल्ला खान (324) विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या शेख अफरोजबी शब्बीर (187) यांच्यासह अपक्ष सबाना बी.रऊफ (51), जमीलाबी मुनाफ बागवान (95), शेख शबाना आरीफ (21) यांचाही पराभव केला.
प्रभाग पाच : भाजपाच्या शमीम खान विजयी
प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपाच्या शमीम अहमद खान (243) विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या आझाद तसनीम कौसर मोहम्मद अशीफ (40), नाजीयाबी हनीफ खान (5), शबानाबी रऊफ खान (6), शिवसेनेच्या शेख हमीदाबी गयास (128) यांचा पराभव केला.
प्रभाग सहा : भाजपाचे मुकेश वानखेडे विजयी
प्रभाग क्रमांक सहामधून भाजपाचे मुकेश कैलास वानखेडे (435) विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रशांत प्रभाकर भालशंकर (354) व भारीपचे कौस्तुभ साहेबराव शिंदे (12) यांचा पराभव केला.
प्रभाग सात : भाजपाचे पियुष मोरे विजयी
प्रभाग क्रमांक सातमधून भाजपाचे पियुष भागवत मोरे (400) विजयी झाले. त्यांनी सेनेच्या ज्योती त्रिलोक मालचे (236) यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक आठ : भाजपाच्या साधना ससाणे विजयी
प्रभाग क्रमांक आठमधून भाजपाच्या साधना हरीशचंद्र ससाणे (479) विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या उज्वला राजू बोदडे (167), अपक्ष अनिता विशाल गणेश (55), राजश्री विशाल बोदडे (9) यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक नऊ : भाजपाच्या बिल्कीसबी विजयी
प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपाच्या बिल्कीसबी आसीफ बागवान (284) विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष लक्ष्मीबाई अशोक भोई (102), शिवसेनेच्या शेख खैरूनिसा रऊफ (261), अपक्ष शेख रूकयाबानो शेख मजीद (188) यांचा पराभव केला.
प्रभाग क्रमांक 10 : भाजपाचे शेख शकील विजयी
प्रभाग क्रमांक दहामधून भाजपाचे शेख शकील शेख शकूर खाटीक (238) विजयी झाले. त्यांनी अपक्ष जुबेरशाह निसार शाह (81), सेनेचे इक्बाल गामा शेख (37), शेख जाकीर शेख जाबीर (110), शेख शकील शेख मुसा (190) यांचा पराभव केला.
प्रभाग 11 : भाजपाचे शेख मस्तान विजयी
प्रभाग क्रमांक 11 मधून भाजपाचे शेख मस्तान इमाम (362) अवघ्या दोन मतांनी विजयी झाले तर अपक्ष जाफर अली नजीर अली (360) यांचा निसटता पराभव झाला
प्रभाग 12 : शिवसेनेचे संतोष मराठे विजयी
प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेनेचे संतोष सुपडू मराठे (411) विजयी झाले. त्यांनी भाजपाचे राजेंद्र गणपत माळी (363) व भारीपचे संजय प्रल्हाद कांडेलकर (44) यांचा पराभव केला. राजेंद्र माळी हे माजी सभापती असून त्यांचा मराठे यांनी दारूण पराभव केला.
प्रभाग 13 : भाजपाच्या कुंदा पाटील विजयी
प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपाच्या कुंदा अनिल पाटील (609) विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसच्या सरीता रवींद्र पाटील (102) व अपक्ष सोनाली योगेश पुनासे (427) यांचा पराभव केला.
प्रभाग 14 : शिवसेना उमेदवार सविता भलभले विजयी
प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेेनेच्या उमेदवार सविता सुभाष भलभले (405) विजयी झाल्या. तर तयांनी अपक्ष उमेदवार शीतल लक्ष्मण सापधरे (240) व भाजपा उमेदवार आशा अशोक बोराखडे (367) यांचा पराभव केला.
प्रभाग 15 : भाजपाचे नीलेश शिरसाट विजयी
प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपाचे नीलेश प्रभाकर शिरसाट (331) मतांनी विजयी झाले. त्यांनी कुणाल साहेबराव गवई (66), बळीराम दौलतराव गवई (49), राष्ट्रवादीचे अविनाश समाधान बोरसे (236) व अपक्ष रमेश देवचंद सापधरे (118) यांचा पराभव केला.
प्रभाग 16 : भाजपाच्या मनीषा पाटील विजयी
प्रभाग क्रमांक 16 मधून भाजपाच्या मनीषा प्रवीण पाटील (360) विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार रेखा विलास पाटील (148), शिवसेनेच्या योगीता प्रमोद भारंबे (338), लताबाई प्रभाकर महाजन (12) यांचा पराभव केला.
प्रभाग 17 : शिवसेनेचे राजेंद्र हिवराळे विजयी
प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचे राजेंद्र सुकदेव हिवराळे (467) विजयी झाले. त्यांनी भाजपाचे नितीन मदनलाल जैन (314), रामचंद्र पुरूषोत्तम राणे (43), अपक्ष दीपक प्रल्हाद सूर्यवंशी (14) यांचा पराभव केला.