मुक्ताईनगर- सकल मराठा समाज बहुउद्देशीय संस्था मुक्ताईनगरतर्फे मुक्ताईनगर येथील मराठा समाजाच्या नियोजित मंगल कार्यालय परीरसरात वधू-वर परिचय मेळावा झाला. ‘एक पाऊल सहजीवनाकडे’ या वधू-वर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन तसेच मराठा क्रांती दिनदर्शिकेचे देखील प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास 450 युवक-युवतींनी या प्रसंगी आपला परीचय दिला.
यांची होती प्रमुख उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डी.बी.बच्छाव होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परीषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा परीषद अध्यक्ष उमात शिवचंद्र तायडे, बर्हाणपूर महापौर अनिल भोसले, जिल्हा परीषदेच्या बांधकाम सभापती रजनी चव्हाण, दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी, राम पवार, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, बोदवड सभापती गणेश पाटील, रामदास पाटील, जिल्हा परीषद सदस्य रंजना पाटील, माजी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, मधुकर शिंदे, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे, मराठा सेवा संघाचे बरामपूरचे अध्यक्ष सुनील महाजन, लेखिका कविता पवार, जिल्हा परीषद सदस्य केदार एकडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता महेश पाटील, गवत टिकारे, कैलास चौधरी, सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, विकास पाटील, सुवर्णा साळुंखे, प्रा.रवींद्र लेकुरवाळे, अनिल पाटील, योगेश पाटील, डी.ओ.पाटील, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
मेळावा यशस्वीतेसाठी सकल मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती पाटील, विनोद सोनवणे, रवींद्र महाजन, डी.हि.पाटील, साळुंखे, जगदीश निकम, सदाशीव पाटील, कल्याण पाटील, ललित बाविस्कर तसेच रामभाऊ शंकर पाटील, नगरसेवक डॉ.प्रदीप पाटील यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक रमेश ढोले यांनी तर सूत्रसंचालन बी.आर.पाटील यांनी केले.