मुक्ताईनगर- रामायणकार, आद्यकवी महर्षि वाल्मिकी जयंती उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढून सामाजिक प्रबोधनदेखील करण्यात आले. शहरातील मुख्य प्रवर्तन चौकात भव्य सजवलेल्या व्यासपीठावर महर्षि वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहरभर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महर्षी वाल्मिकी यांच्या यांची प्रतिमा रथात ठेवून संपूर्ण शहरभर मिरवणूक काढण्यात आली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शांताराम कांडेलकर, नामदेवराव कांडेलकर, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, जिल्हा परीषद सदस्य वैशाली तायडे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, नगरसेवक बबलू कोळी, निलेश शिरसाठ, डॉ.दिवाकर पाटील, पंकज कोळी, संजय बाविस्कर, सुकलाल सांगडकर, सुरेश कोळी, पांडुरंग बाविस्कर, नितीन कांडेलकर, राजू कांडेलकर, राजू सांगडकर, गुणवंत पीवटे, चंद्रकांत भोलाणे, भगवान कोळी, संजय कोळी, महेंद्र कोळी, भगवान भोलाणे, गोपाळ सोनवणे, पुंडलिक पाटील, जीवराम कोळी, डॉ.जितेंद्र तायडे, पंकज कोळी, संजय कांडेलकर, देविदास कोळी, विजय कोळी, सुरेश भोलाणे, सतीश कोळी, शिवाजी पाटील, चंद्रकांत धाडे, कृष्णा पाटील, मधुकर नावकर, सूर्यकांत पाटील, शेषराव कांडेलकर, रवींद्र कांडेलकर या प्रमुख पदाधिकार्यांसह मोठ्या संख्येने तालुकाभरातील युवक उपस्थित होते.