Rape of woman in Muktainagar : Crime against four of woman in Muktainagar : Crime against four मुक्ताईनगर : शहरातील एका भागातील रहिवासी व बिहार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 36 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला तसेच शिविगाळ करण्यात आल्याची घटना 17 रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा
शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या महिलेसह तिच्या मुलांना संशयीतांनी शिविगाळ करीत विनयभंग केला तसेच शहरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेने तक्रार दिल्याने संशयीत भोला युवराज शेजोळे, विकास युवराज शेजोळे, विशाल युवराज शेजोळे, युवराज शेजोळे (सर्व रा.मुक्ताईनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महम्मद तडवी करीत आहेत.