नेत्यांची प्रतिष्ठा पणाला ; नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 प्रभागांसाठी 153 उमेदवारी अर्ज दाखल
मुक्ताईनगर – 15 जुलै रोजी होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून त्यात भारिप बहुजन महासंघानेही उडी घेतल्याने ही निवडणूक चुरशीची होईल, असे एकूणच चित्र आहे. ननामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 17 प्रभागांसाठी 153 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्षपदासाठी सहा नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.
भाजपा विरुद्ध महाआघाडीचा रंगणार सामना
सोमवारी सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांच्या महाआघाडीसंदर्भात नवीन मुक्ताई मंदिरावर बैठक झाली. सेनेला दहा, काँग्रेसला चा तर राष्ट्रवादीला तीन जागांबाबत बोलणी करण्यात आली. नगराध्यक्ष पदाबाबत मात्र अंतिम निर्णय ऐनवेळी घेण्यात येणर आहे त्यामुळे भाजपा विरुद्ध महाआघाडी असे चित्र मुक्ताईनगरात स्पष्ट झाले असून या निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागेल यात शंकाच नाही.
असे आहेत पक्षनिहाय उमेदवार
शिवसेना- प्रभाग क्रमांक एक- प्रशांत अशोक टोंगे, प्रभाग क्रमांक दोन- शगुप्ता बी.अफसर खान, प्रभाग क्रमांक चार- अफरोज बी.शेख शब्बीर, प्रभाग क्रमांक पाच- हमीदाबी शेख गयास, प्रभाग क्रमांक सहा- भालशंकर प्रशांत प्रभाकर, प्रभाग क्रमांक सात- ज्योती त्रिलोक मालचे, प्रभाग क्रमांक नऊ- खैरूनिस्सा शेख रऊफ खाटीक, प्रभाग क्रमांक दहा- शेख कलीम शेख रसूल, प्रभाग क्रमांक अकरा- सलीम खान सईद खान, प्रभाग क्रमांक बारा- संतोष सुपडू मराठे, प्रभाग क्रमांक तेरा- पूनम वैभव पाटील (मात्र एबी फॉर्म दाखल नाही), प्रभाग क्रमांक चौदा- सविता सुभाष भलभले , प्रभाग क्रमांक सोळा- योगीता प्रमोद भारंबे, प्रभाग क्रमांक 17- राजेंद्र सुखदेव हिवराळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस –
प्रभाग क्रमांक एक- रवींद्र देविदास धनगर, प्रभाग क्रमांक दोन- फकीर सलीमाबी आलम शहा, प्रभाग क्रमांक पंधरा – बळीराम दौलतराव गवई, प्रभाग क्रमांक 16- लताबाई प्रभाकर महाजन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-
प्रभाग क्रमांक आठ- उज्ज्वला राजू बोदडे, प्रभाग क्रमांक पंधरा- अविनाश समाधान बोरसे
भारीप बहुजन महासंघ
प्रभाग क्रमांक आठ आशा देवेंद्र बोंदडे, प्रभाग क्रमांक बारा- संजय कांडेलकर, प्रभाग क्रमांक पंधरा- कुणाल साहेबराव गवई, प्रभाग क्रमांक सहा- कौस्तुब साहेबराव शिंदे