मुक्ताईनगर : भीमा-कोरेगाव हल्ल्याच निषेध व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारीप बहुजन महासंघातर्फे प्रवर्तन चौक ते महामार्गावरील संत मुक्ताई चौकापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. शहरातील व्यावसायीकांनी दिवसभर दुकाने बंद ठेवत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलकांनी तालुक्यात खाजगी प्रवासी वाहतूक बंद केली.