A lawyer In Muktainagar Castigated : मुक्ताईनगर : शहरातील 55 वर्षीय वकिलाने केस न घेतल्याने त्यास जातीवाचक शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालय रस्त्यावर कॉलर पकडत जीवे ठार मारण्याची धमकी
55 वर्षीय वकिलाच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी संजय जोशी, चारूशीला जोशी व लड्डू संजय जोशी (शहापूरा, जि.बर्हाणपूर) यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता केस न घेतल्याच्या रागातून न्यायालय रस्त्यावर जातीवाचक शिविगाळ केली तसेच त्यांची कॉलरही पकडण्यात आली तसेच वाहनावर चपला मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे करीत आहेत.