मुक्ताईनगर : शहरासह तालुक्यात घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही.शहरातील गोदावरी नगरातील रहिवासी तथा कर्की येथील राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालयाचे शिक्षक संजय सेनु वाडीले यांच्या बंद घरातून चोरट्यांनी आठ हजारांच्या रोकडसह अन्य मुद्देमाल मिळून 15 हजारांचा ऐवज लांबवला.
चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांना आव्हान
संजय वाडीले हे पुतण्याचे लग्न असल्याने गेल्या चार दिवसांपासून आपल्या मूळ गावी अंतुर्ली येथे गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी संधी साधली. चोरट्यांनी समोरील दरवाजाला लावलेले कुलूप तोडत बेडरूममधील कपाटातून एक ग्रॅम सोन्याचा ठोकळा तसेच चांदीचे शिक्के व इतर चांदीचे वस्तू आणि छोट्या पाकिटात ठेवलेले पाच हजार रुपये रोख व पिगीबँकमधील अंदाजे रोकड मिळून सुमारे 15 हजारांचा मुद्देमाल लांबवला. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर घरफोड्या व किरकोळ चोर्यांचे प्रकार सुरू असून कोथळी येथील तपासातील यश वगळता मुक्ताईनगर पोलिसांना किरकोळ चोर्यांचे सत्र थांबवता येत नसल्याने पोलिसांच्या कृतीविषयी संताप व्यक्त होत आहे.