मुक्ताईनगरात सेनेला जय महाराष्ट्र करीत कार्यकर्त्यांनी केला नमो नमोचा गजर

0

माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वावर विश्‍वास दाखवत अनेकांचा भाजपात प्रवेश

मुक्ताईनगर- नगरपंचायत निवडणुकीने राजकीय रणांगण तापायला सुरूवात झाली आहे. त्यात राजकीय डावपेच आखले जात असून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून इतर पक्षातील कार्यकर्त्यांना गळाला लावून आपल्या पक्षात प्रवेश दिला जात आहे.त्यानुसार शिवसेनेच्या दीक धुंदले व अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने राजकीय फड चांगलाच रंगू लागला आहे. मुक्ताईनगरात भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्रभ एकनाथराव खडसे यांच्या विकासात्मक व सर्व समावेशक नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या अल्पसंख्याक समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यांची होती उपस्थिती
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षाचा रुमाल गळ्यात घालून कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले व निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परीश्रम घेण्याचे आवाहन केले. यावेळी अमिन खान, आतीक खान, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, संदीप देशमुख, पुरुषोत्तम महाजन, ललित महाजन, प्रदीप साळूंखे पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

यांनी घेतला भाजपात प्रवेश
शिवसेनेचे अन्वर शाह अजीज शाह, शाहरुख खाटीक, शे.खलील शे.जमील, फरहान शाह सुलतान शाह, शरीफ खान, खमीन खान अनिस खान, शोएब शे.नवाज, शे.वसीम शे.हुसेन, शे.शोएब शे.उस्मान, शे.शोएब शे.रफिक, शे.रहेमान शे.बिसमिल्ला, सजीक शे.फरहान खाटीक, हुसेन शाह रहेमान शाह, शे.शकील शे.अमीर या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.