मुक्ताईनगरात 23 डिसेंबर रोजी मराठा समाजाचा वधू-वर परीचय मेळावा

0

रावेर- मराठा समाजाचा वधू-वर परीचय मेळावा 23 डिसेंबर रोजी मुक्ताईनगर येथे येथे होणार आहे. रावेर येथे झालेल्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील कै.शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात रविवारी मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड, यावल, बर्‍हाणपूर येथील समाजबांधव उपस्थित होते. बैठकीत रावेर तालुका मराठा समाज वधू-वर परीचय समितीमार्फत सालाबादाप्रमाणे घेण्यात येणारा वधू-वर परीचय मेळावा यावर्षी मुक्ताईनगर येथे घेण्यात यावा, असे एकमताने ठरविण्यात आले. वधू-वरांनी आपापले परीचय पत्र व प्रतिष्ठितांनी जाहिरात 5 डिसेंबरपर्यंतच समिती सदस्यांकडे किंवा योगराज ऑफसेट येथे जमा करावी, असेही ठरविण्यात आले. या मेळाव्यात रेशीमबंध या वधू-वर सुचीचे प्रकाशन हे रविवार 23 डिसेंबर 2018 रोजी घेण्याचे एक मताने ठरविण्यात आले. बैठकीत रावेर येथील समितीचे अध्यक्ष सी.एस.पाटील, डॉ.सुरेश पाटील, योगीराज पाटील, रमेश नगराज पाटील, जे.के. पाटील, घनःशाम पाटील, योगेश महाजन, प्रशांत पाटील, छोटु पाटील, अ‍ॅड. धनराज पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र चौधरी, पी.आर.पाटील, ललित चौधरी, सचिन पाटील, वामनराव पाटील, कडू पाटील, अंबादास महाजन, कमलाकर पाटील, विलास ताठे, भुसावळचे प्रा.पंकज पाटील, मुक्ताईनगरचे निवृत्ती पाटील, विनोद सोनवणे, बोदवडचे बबनराव शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.