मुक्ताईनगरात 3 विद्यार्थी डीबार

0
मुक्ताईनगर – येथील जे.ई.स्कूल येथील इयत्ता दहावीच्या परीक्षा केंद्रावर जळगाव येथील भरारी पथकाने केलेल्या कारवाईत तीन विद्यार्थी डीबार झाले आहेत. गणिताच्या पेपर सुरू असताना कॉपी करणारे तिघे विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. यात २ विद्यार्थी अल फलाह उर्दु शाळेचे तर एक विद्यार्थी खडसे आश्रमशाळेचा असल्याचे तालुका शिक्षण अधिकारी जे.डी.पाटील यांनी यांनी सांगितले. हि कारवाई राज्यमंडळाच्या प्राध्यापक शुभांगी दिनेश राठी यांनी केली आहे. दरम्यान डिबार झालेला रोहन इक्बाल शाह हा विद्यार्थी अल फलाह उर्दु शाळेचे मुख्यध्यापक इक्बाल शाह यांचा मुलगा आहे. मुख्यध्यापकाच्या मुलावरच डिबार होण्याची कारवाई झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.