मुक्ताईनगर- अवैध वाळू वाहतूकदारांविरूद्ध महसूल पथकाने मोहिम उघडली असून तहसीलदार शाम वाडकर व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत एक डंपरसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. दोघांना दंडाच्या नोटीस नोटीस पाठवण्यात येणार असून पोलिसांच्या ताब्यात वाहने देण्यात आली आहेत. 13 डिसेंबर रोजी नायगाव मुक्ताईनगर रस्त्यावर विना क्रमांकाचे ट्रॅक्टर हे वाळू वाहतूक करताना तहसीलदार श्याम वाडकर तसेच मंडळ अधिकारी रवींद्र झाल्टे, तलाठी महादेव दाणे तसेच नायगावचे तलाठी निलेश काळे यांच्या पथकाला आढळून आले. परवान्याची विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याने ट्रॅक्टर लगेच ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 14 डिसेंबर रोजी देखील दुपारी मुक्ताईनगर मलकापूर महामार्गावर डंपर (क्रमांक एम.एच.27 एक्स.3306) हे वाळू वाहतूक करत असताना आढळून आल्याने डंपर जमा करण्यात आले. तहसीलदार यांच्या लेखी तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात दोन्ही वाहने ताब्यात देण्यात आलेली आहे.