मुक्ताईनगर तालुक्यातील 12 गावांचा पेयजल योजनेत समावेश

0

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत 12 कोटी 14 लाखाच्या योजनेला मंजुरी

मुक्ताईनगर- माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील 12 गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मंजुरी मिळाली असून 12 कोटी 14 लाखाच्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणीप्रश्‍न सुटणार आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील कुर्‍हा, काकोडा, हरताळे, वडोदा, पूर्णाड, नांदवेल, धोंडखेडा या गावांना ही योजना मंजूर झाली आहे

तीन तालुक्यातील 12 गावांसाठी योजनेला मंजुरी
रावेर तालुक्यातील निंबोल, सुनोदा गहुखेडा, कोचुर बुद्रुक या गावांना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 12 कोटी 13 लाख 84 हजार रुपयांच्या पाणीपुरवठा कामांना मंजुरी मिळाली आहे. कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात येत असून पूर्तता झाल्यानंतर लवकरच निविदा काढून कामांना प्रत्यक्ष आरंभ करण्यात येणार आहे तर मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा, काकोडा, हरताळे, वढोदा, पुरनाड, नांदवेल तसेच बोदवड तालुक्यातील धोंडखेडा व रावेर तालुक्यातील निंबोल, सुनोदा, गहुखेडा, रणगाव तसेच कोचुर बु.॥ येथे योजनेला मंजुरी मिळाली आहे.