मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणार्या कंटेनरमधून 69 गोर्ह्याची पोलिसांनी सुटका केली असून दोघांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील अंतुर्ली फाटा ते बेलसवाडी फाट्यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
अवैध गुरांची वाहतूक ऐरणीवर
मध्यप्रदेशातील बर्हाणपूरहून मुक्ताईनगरकडे कंटेनर (क्रमांक यु.पी.21 एन.3037) यातून गोर्ह्यांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अंतुर्ली फाटा ते बेलसवाडी फाट्यादरम्यान कंटेनरला पकडण्यात आले. या कंटेनरमध्ये 69 गोर्हे आढळल्यानंतर परवाना आढळून न आल्याने पोलिसांनी पाच लाख रुपये किंमतीचे कंटेनर व साडेतीन लाख किंमतीचे गोर्हे जप्त केले. जप्त गुरांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. याप्रकरणी हवालदार सुनील नागरे यांच्या फिर्यादीवरुन शे.तौसीफ शे.सत्तार (देवास, मध्यप्रदेश) व आझादखा नुरखा( सारंगपूर, जि.रायगड) यांंच्याविरूद्ध विनापरवाना वाहतूक करीत प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.