मुक्ताईनगर तालुक्यात निवडणुकीत चौरंगी लढत

0

तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, पंचायत समितीत सत्ताधारी भाजपाचे वर्चस्व असल्याने या निवडणूकीत भाजपा पक्षाच्या उमेदवारांना रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या संपुर्ण ताकदनिशी प्रयत्नशिल आहेत. तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असुन इतर पक्ष स्वबळावर लढणार आहेत.

जिल्हा परीषद व पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आली असुन जि.प.च्या 4 गटासाठी 27 अर्ज दाखल असुन 8 गणासाठी 41 अर्ज भरण्यात आले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांमध्ये लढत आहे. जि.प. अंतुर्ली, उचंदा गटासाठी अनुसूचित जमाती एसटी. मुक्ताईनगर निमखेडी गटासाठी अनुसूचित जमाती एसटी, कुर्‍हा-वढोदा गटासाठी अनुसूचित जाती (स्त्री) व चांगदेव-रुईखेडा गटासाठी अनुसूचित जाती एससी प्रमाणे आरक्षण निघाल्याने आगोदर पासून आपण निवडणूक लढणार असल्याचे काही मात्तब्बरांची चांगलीच गोची झाली आहे. भाजपाला रोखण्यासाठी इतर पक्ष ताकदनिशीने प्रयत्न- तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, पंचायत समितीत सत्ताधारी भाजपाचे वर्चस्व असल्याने या निवडणूकीत भाजपा पक्षाच्या उमेदवारांना रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपल्या संपुर्ण ताकदनिशी प्रयत्नशिल आहेत. तालुक्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी झाली असुन इतर पक्ष स्वबळावर लढणार आहेत. तालुक्यात भाजपा पक्षाच्या बलाबलीच्या तुलनेत शिवसेना आपल्या संपुर्ण ताकदीनुसार लावणार असुन ही निवडणूक सर्वच पक्षाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. सर्वच पक्षांनी गटातुन व गणातुन कार्यक्षम उमेदवार उभे केले असुन ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. जि.प.गट व पं.स.मधील काही भाग आरक्षीत असला तरी आपापल्या पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी संपुर्ण कार्यकर्ते कामाला लागले आहेत. तालुक्यात चित्र पाहता सत्ताधारी भाजपला टक्कर देणारा पक्ष शिवसेनाच आहेत. तालुक्यात कधीच या दोन्ही पक्षांमध्ये जमली नाही हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. उंचदा गणातून ठरणार सभापती- पंचायत समितीचे सभापतीपद हे अनुसुचित जमातीसाठी आरक्षित आहेत. अंतुर्ली गणातून नामा प्र. (स्वि), मुक्ताईनगर गणातून सर्वसाधारण (स्त्री) निमखेडी बु॥. गणातून जनरल, कुर्‍हा गणातून अनुसुचित जाती, वढोदा गणातून सर्वसाधारण (स्त्री), चांगदेव गणातून नामा प्र. व उंचदा गणातून अनुसुचित जमाती असे आरक्षण असून उंचदा गणातून अनुसुचित जमाती असे आरक्षण असून उंचदा गणातून अनुसुचित जमातीमधून जो उमेदवार निवडून येईल. तो पं.स. सभापतीपदी आरुढ होईल. आपल्या पक्षाचा उमेदवार सभापती पदी आरुढ होण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपली ताकद उंचदा गणावर लावलेली आहे. यासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. सभापतीपदे कोणत्या पक्षाच्या पारड्यात पडले तर मतदार राजाच ठरवू शकेल. याकडे मात्र संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. नोटाबंदी व अतिक्रमण हणविण्याचा परिणाम-भाजपा सरकारने 500 व 1000 रुपयांचा चलनावर बंदी आणल्यापासून सर्वसामान्यांचे खूपच हाल झाले. बँकांमध्ये जुने चलन जमा करण्यापासून ते नवीन 200 च्या नवीन चलन काढण्यापर्यंत सामान्य जनतेला वेढीस धरले जात होते. बँकांमधून नवीन चलनाच्या 2000 च्या नोटा काढण्याची मर्यादा नसल्याने व 2000 रु. चिल्लर मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेला सरकार बद्दल आक्रोश निर्माण झाला होता. तसेच बाजारपेठेतील अतिक्रमण तोंडावर निवडणूका आल्यावर सुध्दा ग्रामंपाचयतीने हटविल्याने याची रोश सत्ताधार्‍याबद्दल व्यावसायिकांचा असल्याने या निवडणूकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो नोटाबंदी व अतिक्रमण काढणे भाजपाला तारक कि मारक ठरेल! या दोन्ही गोष्टीचा विपरित परिणाम निवडणूकीवर ठरेल का?

बंडखोरीची शक्यता- जि.प.च्या गटासाठी 27 अर्ज तर पं.स.च्या 8 गणांसाठी 44 उमेदवारी अर्ज सर्वच पक्षाकडून भरण्यात आले असून यात प्रमुख दोन पक्ष म्हणजे भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षामध्ये चुरशीची निवडणूक रंगणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली असून कुठे तरी जागा वाटपावरुन कुरघोडी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. काही पक्षांची कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळून वेळेवर पक्षांची उमेदवारी व ए.बी.फॉर्म न दिल्याने कार्यकर्त्यांचे मन दुखावले गेले असून पक्षावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यक्षमतेचा जनसंपर्काचा उपयोग करुन आपल्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा फंडा वापरतील अशी शंका कार्यकर्त्यांमधून बोलली जात आहे. दोन्हीच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ या म्हणी प्रमाणे पक्षांवर या गोष्टींचा कितपत परिणाम होईल. दरम्यान सत्ताधारी भाजपाने तसेच इतर पक्षांनी केलेल्या विकास कामांमुळे तसेच मागील गटातूनच गणातून निवडून आलेल्या उमेदवारांनी आपल्या भागासाठी केलेल्या कामांवरुन तसेच पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे कार्यक्षमता, कार्यशैली, जनसंपर्क पक्षाने मतदारांसाठी केले कार्य या निवडणूकीचे महत्त्वाचे मुद्दे ठरु शकतात. सर्वच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागलेली असली तरी सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी इतर पक्ष कोणता फंडा वापरतील व मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने असणार याकडे सर्वच जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

– संजय वाडीले
7975308872