मुक्ताईनगर तालुक्यात वॉश आऊट : सव्वा लाखांची गावठी दारू नष्ट

0

मुक्ताईनगर- पोलिस उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय हिरोळे, बाबुराव अटकाळे, तायडे, कचरे आदी कर्मचार्‍यांनी तालुक्यातील सातोडा शिवारातील दोन गावठी हातभट्टींवर छापे टाकत एक लाख 16 हजार 300 रुपयांचे गावठी हातभट्टीची दारू, गुळ-मोह मिश्रीत रसायन नष्ट केले. प्रकाश रामभाऊ बेलदार व भागवत विश्वनाथ बेलदार (दोन्ही रा.सातोड ता.मुक्ताईनगर) यांच्याविरुध्द मुक्ताईनगर पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.