मुक्ताईनगर । ग्रामीण आरोग्य अभियानातर्फे राबविण्यात येणार्या सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली, कुर्हा, रुईखेडा, उंचदा व उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तु.ल. कोळंबे विद्यालयात जागतिक सिकलसेल दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून रक्तामध्ये विळ्यासारख्या दिसणार्या तांबड्या रक्तपेशी असतात त्याला सिकलसेल आजार असे म्हणतात. यात ताप येणे छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा सि होणे, थकवा, अशक्तपणा, निस्तेजपणा वाटणे, पोटदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, धाप लागणे हि लक्षणे आढळतात.तालुका सिकलसेल सहाय्यक प्रमोद मेश्राम यांनी सिकलसेल आजारविषयी मार्गदर्शन केले. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निलेश पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. सुभाष सुशिर उपस्थित होते. कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. डी. सरोदे यांनी सिकलसेल चाचणी आपआपल्या शाळेत करुन घ्यावयाचे आवाहन केले. केंद्रप्रमुख एस.व्ही. ठोसर, तडवी, शेख अमिर , ए.बी. पाठक उपस्थित होते.