मुक्ताईनगर : तालुक्यातील अंतुर्ली व मेंढोदे येथील पुनर्वसित गावठाणातील भुखंड धारकांना 126 भुखंडांचे वाटप माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सभापती राजू माळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, विलास धायडे, योगेश कोलते, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे, जावजी धनगर, रमेश ढोले, किरण चौधरी, ताहेरखान पठाण, तहसिलदार जितेंद्र कुवर, गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडेे उपस्थित होते.
लहान मुलांच्या हाताने काढण्यात आली सोडत
प्रसंगी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांनी भुखंडाचे क्रमांकावर तयार केलेल्या चिठ्ठ्यांची लहान मुलांच्या हाताने सोडत काढून नावे घोषीत केली.